ज्यांना अभ्यासू वृत्तीने (धार्मिक वृत्ती तसेच पूर्वग्रह आणि पूर्वसंस्कार थोडे बाजूला ठेवून बुद्धिप्रामाण्यवादी वस्तुनिष्ठ दृष्टीने) रामायणावर केलेला विचार वाचायचा असेल त्यांनी श्री. भास्करराव (अप्पासाहेब) जाधव यांनी लिहिलेले "रामायणावर नवा प्रकाश", प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पहिली आवृत्ती १९५१, दुसरी आवृत्ती १९९१,  हे परखड पुस्तक अगदी जरूर वाचावे. वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करून त्यावर लिहिलेल्या व विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात्मक लेखांचा संग्रह असे ह्या पुस्तकाचे स्वरूप आहे. पुस्तकामध्ये वाचकांच्या पत्रांना दिलेल्या उत्तरांचाही समावेश आहे.
ह्या पुस्तकामध्ये वाली वधाबद्दल (सप्रमाण) काय लिहिले आहे हे वेळ मिळताच थोडक्यात इथे लिहिण्याचा प्रयत्न करीन.