आतापर्यंत आपण बुद्ध्यांकाचा उदोउदो केला आता भावनांकही तितकाच महत्त्वाचा असतो हे मानसशास्त्रज्ञ ओरडून सांगताहेत पण लक्षात कोण घेतो ?
जोपर्यंत भावना मोकळ्या कश्या करायच्या ते कळत नाही, तोपर्यंत असच चालणार, संतोष. आजकाल मुलं अतिसंवेदनशील झालीय असं मला वाटतं. त्यांना कधीकधी हिंसाचाराबद्दल काहीच वाटत नाही. उलट ते त्याची मजा घेतात. बालकं अजुनही बालकंच आहेत की अकाली प्रौढ झालेली मुलं हेच कळत नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील कित्येकांना 'श्यामची आई' पटणार नाही.
बाकी 'हॅम्लेट' राव चित्रपटात केवळ एकच प्रसंग नाही हो. असो, तुमची मर्जी.
पण त्याला त्याची 'स्पेस' देतो या नावाखाली स्वतःची जबाबदारी ढकलून देणारे पालक, मला पटत नाही.
संतोष एक चांगला विषय निवडला त्याबद्दल धन्यवाद.