लेख आवडला. बर्याच दिवसांनी अखेरीस लिहिलात याचा आनंद झाला.
'कवठे' ही कथा म्हणजे तर जी. एं. च्या हातून लिहिला गेलेला 'नंदा प्रधान' सारखा अजब प्रकार आहे. पण हे सगळे अगदी अपवादाने.
हे अगदीच पटले नाही. कवठे ही एकमेव सुखांतिका असली तरी तिची थीम मला जीएंच्याच नाग या कथेसारखीच वाटली. कवठेमधील जीएंच्या इतर कथांच्या तुलनेत ही कथा कमी पडली आहे असे वाटले नाही.
कैरी या कथेबाबत विजय पाडळकर यांच्या मताशी अगदी सहमत आहे. कैरी ही जीएंची कदाचित सर्वोत्कृष्ट कथा. पण त्याचीही चानी व्हावी याचे वाईट वाटले.