हा गालात जीभ ठेवून (टंग इन चीक) 'घड'वलेला अभिप्राय आवडला.
आपली सर्वांची त्यावर वाद घालण्याची त्यातून सोयही 'घड'वली, हे तर तिचे आपल्यावर महाउपकार आहेत.
- वा वा. क्या बात है!
कोळी आणि वाटमारी यांचा नेमका संबंध मला कळलेला नाही.
- मासेमारीचा धंदा नसेल चालला. कर्जाचे हप्ते वेळेवर फेडले नाहीत म्हणून बँकेने/सावकाराने होडी जप्त केली असेल. त्या काळातही आर्थिक मंदी येत असावी अधूनमधून. धंदा न चालण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा अध्यात्म-मार्गी लागण्यास व अमर काव्य प्रसवण्यास (उदा. : वाल्मीकी व तुकोबा) किती होतो हे आपण साऱ्या सद्यकालीन मंदीग्रस्तांनी लक्षात घेण्यासारखे आहे.