अवचनभंग - ज्यायासाथी वचन दिले त्या भरतानेच माघार घेतल्याने वचनभंगाचाचे पाप रामाला लागत नाहि. १४ वर्षे राज्यपद सांभाळण्यासाठी मिळाल्याने कैकयीची मुळ ईच्छाही पुर्ण झाली आहे.
वाली वध - तो वधच होता. खून नाही. (वालीचे चारित्र्य तपासा) शत्रू ला मारताना कोणताही पर्याय वर्ज्य नाही.(लपूनही). मित्राच्या वचनासाठी केलेला तो वध होता. तसेच मरताना जरी शाप दिला 'तुझ्या हातून मरण आल्याने मुक्ती मिळाली', असे म्हणून त्याने पुत्र अंगदाला रामाच्या हवाली केले.
यज्ञ - राम हा यज्ञ संस्कृतीचा रक्षक होता असे म्हणतात. मग त्याने लक्ष्मणाकरवी इंद्द्रजीताच्या यज्ञाचा विंध्वस का केला? -- वाईट हेतूने केलेले चांगले काम वाईटच. शंकराची उपासना करून भस्मासुराने मिळवलेले वरदान चांगले का? (केवळ तप चांगले म्हणून?)
शंबुक वध - ६. शंबुक पूर्वजन्मी शंबू नावाचा दानव होता. निशदे.
हे खरेच. पण दुसरी बाजू हि पहा. सध्याच्या कालाने थोडा विचार करा. शंबुकाला का मारले? अधिकार नसताना तप केले म्हणून. सध्याच्या काळात M.B.B.S. नसताना डॉ. की चा गंध नसताना कोणी operation करु लागला तर त्याच्या वर कारवाई होईल अथवा नाही? त्या काळी कामानुसार वर्ण रचना होती (जन्मानुसार नाही.) त्याकाळी प्रचलित पद्धतीनुसार योग्य परवानगी अगर मार्गदर्शन न घेता त्याने तप केले, कायदा मोडला, त्याचे काही गंभीर परिणाम उद्भवले. त्यासाठी त्याला त्या वेळी प्रचलित कायद्याने शिक्षा झाली .
तसेच रामात काही दोष असतील हि पण म्हणून दोषच पाहणार काय? चु. भु. दे̱. घे. पण माझ्या माहिती नुसार स्वामी विवेकानंद सिगारेट खुप ओढत. केवळ त्या साठी त्यांचे इतर काम दुर्लक्षायचे का? सकारात्मक रहा. आजच्या पिढिसाठी ऱाम आदर्शच आहे. ( असलेच तर काही दोषांसहित ही). त्याचे मित्रप्रेम, त्याग, वचननिष्ठता, एकपत्नीव्रत , पराक्रम , प्रजाकर्तव्यदक्षता (ऱामराज्य) पहा. आज हे सर्व गुण असणारा दाखवा.