"या पृष्ठ भूमीवर मला राम हा आदर्श पुरुष वाटत नाही."
तुमचं हे वाक्य ही तुमच्या वरील लेखात एक व तुम्ही ह्या प्रतिसादात सांगता एक असंच आहे. श्री. जोशी, तुम्ही 'माझे आदर्श' ह्या संकल्पनेत जी मंडळी येतात त्यांची नावे आधी द्यायला हवी होती, त्यानंतर 'राम' व इतर मंडळी ही माझ्या आदर्शांच्या संकल्पनेत येत नाहीत. असं लिहायला हवे होते.
'मनोमिलन होण्यासाठी शरीर संबंध व्ह्यायलाच हवेत', हा आपला अनाडीपणा आहे. 'शरीरसंबंध होवूनही मनोमिलन होत नाही' ह्या गोष्टीचे आपल्याला अज्ञान आहे.
'माणसाच्या आयुष्यातील जिथं एक भाग स्वतःच्या नियंत्रणात असतो, तिथं त्याच क्षणी त्याच्या आयुष्याचा दुसरा भाग नियती ठरवत असते.' ह्या वाक्याचा अर्थ परमेश्वर आपल्याला लवकरच दाखवून देवो.
(व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)