रामाला वचनपूर्तीसाठी वनवासात पाठवले असेल मात्र रामाने त्याचा राज्यविस्तारासाठी उपयोग करून घेतला असेल, असे वाटते. 

मला विभीषण रामभक्त वगैरे वाटत नाही. रामाने त्याचा फायदा घेतला, आणि रामाकडे तो स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीच आलेला होता.

अयोध्येचा राजा सगळे सोडून लंकेच्या गादीवर बसणार नाही याची विभीषणाला पूर्ण खात्री असणार आणि आपण त्याला जाऊन मिळालो तर लंकेची गादी आपलीच याचीही पूर्ण कल्पना विभीषणाला असणार. त्यामुळे विभीषणाने रामभक्तीपोटी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी रामाची बाजू घेतली आहे. रावणाचे कच्चे-पक्के दुवे ठाऊक व्हावेत यासाठी रामानेही त्याला आपल्या बाजूला येऊ दिले. हे राजकारण रामाकडून आणि विभीषणाकडूनही. माझ्यामते त्यात गैर असे काही नाही. मात्र नंतर त्याला उगाचच भक्तीचा मुलामा का चढवला गेला समजत नाही.