सातवाहन, गुप्त, वर्धन आदि अनेक राजघराण्यांची वंशावळही पुराणात सापडते आणि ती बरोबर असल्याचे इतर पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. (कोणाचा कोणत्या पुराणात उल्लेख हे मात्र पाहावे लागेल.)
सातवाहनांच्या काही राजांची नाणी सापडली आहेत मात्र त्यांचा उल्लेख वंशावळीत नाही तर काही राजांचे उल्लेख वंशावळीत आहेत पण त्यांचे प्रत्यक्ष काहीच पुरावे सापडत नाहीत.