कवठे ही एकमेव सुखांतिका असली तरी तिची थीम मला जीएंच्याच नाग या कथेसारखीच वाटली.

आश्चर्य आहे! मला तरी कवठे आणि नाग या कथांच्या थीममध्ये काहीही साम्य वाटत नाही. 'कवठे' ही कोणत्याही अर्थाने कमी पडली आहे, असे मलाही वाटत नाही. एकमेव सुखांतिका म्हणून ती वेगळी आहे, एवढेच.
'कैरी' ही जी. एं. ची एक उत्कृष्ट कथा. सर्वोत्तम? हम्म. बघावे लागेल. फुंका, कसाब, अंजन, दूत, माणूस नावाचा बेटा, राधी......