मुळात राजचे मुद्दे कोणत्याही माणसाला मान्य होतील आणि पटतील असेच आहेत. किंबहुना मी तर असे म्हणीन की तो कित्येकांच्या मनातलं बोलतोय. मुंबई, पुणे किंवा नाशिक परिसरात राहणाऱ्या लोकांनातर जास्तच, कारण ही लोकं ते सर्व अनुभवत आहेत, जे त्याने म्हटले आहे.

मुद्दा बरोबर पण मार्ग चुकीचा :-

मुळिच नाही. मनसेच्या संकेतस्थळावर बघा. जेंव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते, तेंव्हाही त्यांनी या मुद्द्यावर आंदोलनं केली होती. ती शांततापुर्ण होती. पण मुजोर रेल्वेने त्यांना उडवून लावले, त्यामुळे त्यांना कळेल अश्याच भाषेत आंदोलन करणे भाग पडले.

तिकडे अमरसिंग किंवा अबू आझमी 'काठ्यावाटपाचा कार्यक्रम घेवू' म्हणतात त्याला कोणिच काही म्हणत नाही, मात्र राज ठाकरेंचा ' .... तर आम्हाला तलवारवाटपाचा कार्यक्रम घ्यावा लागेल' वर लगेच निषेध नोंदवल्या जातात.

आम्हाला तेवढं सहिष्णुता, राष्ट्रभाषेचा आदर शिकवला जातो, द. भारतात हिंदी शिकवल्यासुद्धा जात नाही, त्याला कोणिच काही म्हणत नाही. ज्या लिट्टेने काँग्रेसचे नेते व दिवंगत पंतप्रधान राजिव गांधीची हत्या केली, त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या तमिळांना काहिच नाही.

लक्षात घ्या, जर आताच आपण सावध झालो नाही आणि केवळ मुद्दा बरोबर, पण मार्ग चुकीचा वगैरे म्हणत राहिलो, तर हेच भैय्या आपल्या छाताडावर नाचायला वेळ नाही लागणार.

'मेणाहून मउ आम्ही रामदास, प्रसंगी नाठाळास काठी .... ' (चु.भु.द्या. घ्या. ) हेच लक्षात ठेवा, किंवा राष्ट्रभाषेत, "लातोके भुत बातोसे नही मानते" हे लक्षात ठेवा.

राजच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांना मदत कशी करता येईल (पर्यायाने स्वतःची ) याचा विचार सर्वात आधी करायला हवा.