जयंत५२ यांनी म्हटल्याप्रम्मणे, वरदाने एक उत्तम खजिना सादर केला आहे यात शंका नाही. मूळ लेखकाला ही धन्यवाद‌. सावरकरांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. त्यावेळी एखादी नवीच कल्पना आपल्याकडे अस्तिवातच नसतना आली तर नवा चांगला शब्द सापडेपर्यंत इंग्रजी शब्द वापरावा असेच सुचवले होते. 

बेकरी साठी भर्जनी हा असा नवा सुचवलेला शब्द! छान आहे! पण रूढ नाही.

शब्द रूढ होण्याची प्रक्रिया तशी कठीणच! अभिजन वर्ग एखादी संज्ञा प्रथम वापरतो. सातत्याने त्याचा वापर होऊ लागला की त्याचे अनुकरण इतर सामान्य लोक देखील करू लागतात.

शब्द अवघड नसतात. अपरिचित असतात. त्यामुळे त्यांचे स्वागत  मन सहजासहजी करत नाही.  नाणे जसे  अनेकदा वापरले गेले की त्याच्या कडा गुळगुळीत होतात, आणि मग त्याचे कंगोरे टोचेनासे होतात तसेच शब्दांचे ही आहे. नवे घडवलेले शब्द चिकाटीने वापरायला हवेत.

स्व-भाषेच्या अभिवृद्धीसाठी आग्रही मंडळीच हे काम करू शकतील. हल्ली मात्र हा आग्रह पार लयाला जाताना दिसतो आहे. त्यामुळेच "मिंग्लिश"चे फावू लागले आहे!