त्या काळीही गर्भनिरोधक आणि गर्भनिःपातक द्रव्यौषधी वगैरे होती असे तर नाही
विचार करण्यासारखा मुद्दा आहे. गर्भनिरोधक कदाचित माहीत नसले तरी गर्भनिःपातक उपाय माहीत असायला हरकत नसावी. तसेही कुठल्याही गोष्टीत निवारक उपाय आधी कळतात आणि प्रतिबंधक उपाय प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात कळतात असे सर्वत्र दिसते. निवारक उपाय करा आणि चुका असे करून करून पाहता येत असल्यामुळे त्यांचे आकलन होण्यासाठी तुलनेने कमी संसाधने लागत असावीत. प्रतिबंधक उपाय शोधण्याला नक्कीच अधिक प्रगतीची आवश्यकता असावी.