कटककर साहेब,

या चर्चेत काही राम नसल्याने काही लिहायचे नाही, असे ठरवूनही हे लिहितो आहे. याचे एकमेव कारण म्हणजे गझलेवरून चालू केलेली एक विधायक चर्चा कर्मधर्मसंयोगाने तुम्ही व्यक्तीवर - पक्षी माझ्यावर, मीरवर, गालिबवर, तुमच्या स्वतःवर - आणून ठेवली आहे. बाकी कुणावरही काही टिप्पणी केलीत याचे एक मला काही सुखदुःख नाही; पण तुमचेच पण माझ्यापुरते पहाल तर सच्चेपण आहे  हे विधान उचलून मीही दावा करतोच की माझ्या 'भूल'विषयक शेरात सच्चेपण आहेच. तुम्ही लिहिलेल्या मृत्यूवरच्या शेरातले सच्चेपण तुम्ही स्वतःला झालेल्या अपघाताने नि त्यायोगे मृत्यूच्या चाहुलीने अधोरेखित करत आहात. या सच्चेपणाबद्दल अर्थातच शंका घ्यायचे कारणच नाही; मी तशी ती घेतही नाही/घेणारही नाही. "काय भूषणसाहेब मृत्यूला जिंदगी बहाल केली म्हणाजे काय झाले? अंथरुणातच खितपत पडायची पाळी आली का? की काही कायमचे अपंगत्त्व वगैरे आले ज्यामुळे तुमचे उर्वरीत आयुष्य दुसऱ्यांवर अवलंबून काढायला लागणार आहे (ज्या आयुष्याचे स्वरूप मृतावस्थेपेक्षा वेगळे नाही)? " "की कोमात गेलात? " "की लकवा झाला कायमस्वरूपी? गेलाबाजार अल्जाय्मर्स वगैरे? " मला नाही वाटत अशा स्पष्टीकरणाची गरज आहे. जे सांगायचे आहे ते व्यवस्थित पोचले आहेच. तसेच मलाही सुदैव पळवले म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करायची गरज वाटत नाही. वाटले असते तर सांगितले असते. अगदी वाणसामानाची यादी दिली असती. पण गरजच नाही, तर का म्हणून? काय पळवले गेले हे माहीत आणि किती किमती आहे, हे सुद्धा. त्यामुळे वैयक्तिक ओळख नसताना, एकमेकांच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नसताना सच्चेपणा वगैरे निकष लावायचा अधिकार आपल्याला उरतो का, याचा कृपया विचार करा. माझ्या मते उरत नाही. सच्चेपणा हा दिसतो तो त्या शब्दांमधून/ओळींमधून. त्यांचा अर्थ समजून तुम्हालाही तसा अनुभव आला असेल तर त्यावरून किंवा लिहिणाऱ्याला काय अनुभव आला असेल, याचा विचार करून. म्हणूनच प्रतीत होणाऱ्या एका किंवा अनेक अर्थांचा विचार आणि तो करून उमटनारी प्रतिक्रिया, वाचकाला करावी लागणारी कल्पना, त्याच्या डोळ्यासमोर उभी राहणारी चित्रे हे महत्त्वाचे. तो शेर स्वानुभूतीतून लिहिलाय की कल्पना करून लिहिलाय, हे नाही. हे माझे मत; पटले तर ठीक, पटेलच/पटलेच पाहिजे असे नाही. पण पटले नाही तर बातमी वगैरे म्हणून हेटाळणी करायचा अधिकार आपल्याला आहे, असे मला तरी वाटत नाही. माझ्या शेरांना बातमी म्हणताना, सपाट विधाने म्हणताना तुम्ही जे निकष वापरले तेच निकष वापरून तुमच्या आज तकच्या ठळक बातम्या मी दिल्या इतकेच.

स्वतःचे इतरांना मान्य नसलेले निकष लावून एखाद्याच्या लेखनावर टिप्पणी करणे इथवर ठीक; पण ते पुढे दामटून सच्चेपणावरही प्रश्नचिन्ह ठेवणे हे मला तरी पटत नाही. तसे असते तर मीर, गालिब, सुरेश भट, अहमद फराज असे दिग्गज सोडून कुणीही गझला लिहिल्याच नाहीत/लिहूच नयेत असेच म्हणावे लागेलसे दिसते.

अधिक बोलायची इच्छा नाही. धन्यवाद!