विषय निघालाच आहे तर मनात बरीच वर्षे घर करून असलेली एक शंका विचारतो. पुराण-रामायण-महाभारत काळात असा काही नियम होता का की वनवासाची शिक्षा झालेल्या स्त्रीयांनी (स्वेच्छेने वनात राहणाऱ्या ऋषीपत्नी व वनवासी जमातींतील स्त्रीयांनी नव्हे) त्यांच्या वनवासाच्या काळात अपत्य होऊ देऊ नये? सीतेचे उदाहरण आहेच तसेच द्रौपदीचेही आहे. तिला तर वनवासात जाण्याआधीच पाच पुत्र होते, तेव्हा वंध्यत्वाचा प्रश्न आपोआप निकालात निघतो. पुरुषांचे म्हणावे तर अर्जुनाने वनवासकाळातच उलुपी व चित्रांगदेशी विवाह केला व त्यांची कूस उजवली. मग हा नियम (? ) केवळ शिक्षा झालेल्या स्त्रीलाच लागू होता काय? रामायण-महाभारताचे जाणकार खुलासा करतील काय?