तगमगणारे मन,
धावत राही
मृगजळाच्या मागे ।

फडफडणारा पक्षी,
शोधित राही
घरट्यासाठी धागे ।

उत्तर एक गवसता होती
हजार प्रश्न जागे ।

स्त्रीच्या सनातन व्यथेची व्याख्याच! मर्मस्पर्शी कविता.

जयन्ता५२