मला वाटतं केळी खाणं पुर्वी जरा कमी प्रतीचं खाणं समजत असावेत. भरपूर केळी होत असल्याने त्याना किंमत नसावी. त्यातूनच वेळेला केळं वगैरे सारखे वाक्प्रचार आले असावेत आणि केळी खायला जाणे म्हणजे कमी महत्त्वाचं काम करायला जाणे किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टीसाठी महत्त्वाची गोष्ट सोडणे असा अर्थ आला असावा.