त्यामुळे पार विमनस्क होण्याची आवश्यकता किती?
तुमचा प्रामाणिकपणा आवडला. नियम तुम्ही तोडलात असे मान्य केलेत.
सहसा पार्किंगच्या जागचे नियम वाचावेत व पाळावेत. पुण्यात तर जागोजाग पाट्या, त्यामुळे सुशिक्षीत माणसाने थोडे अवधान ठेवूनच वागावे.
आणि अशा नियमांना वैधानीक / कायदेशीर मान्यता असेल तरच ते पाळावेत अन्यथा नेहमी अशा नियमांना त्यांच्या साहेबांकडे वा योग्य मंचावर, योग्य पद्धतीने " अव्हान द्यावे".
तुमची त्या गड्याने गोची अशी केली!
१. नियमाची पाटी दाखवून त्याने , त्याच्या म्हणण्याला कायद्याची मान्यता आहे, असा तुमचा (गैर) समज निर्माण केला.
नियम तोडणे व कायदा मोडणे वेगवेगळे. नेहमीच घाबरून जाऊ नये. तिथे जर दंड म्हणून " फाशी" लिहिली असती तर तुम्ही हार्टऍटॅकनेच गचकला असतात.
मथितार्थः परिस्थीतीचे " ऑनलाईन" आकलन जमले पाहिजे.
२. तुम्ही त्याचे हात ओले करताना त्याची वैधानीक पात्रता काय? हे न विचारता, तोच अंतीम निर्णय घेणारा अधीकारी आहे, असे त्याने तुम्हास भासवले. तुम्ही त्याला " तुझ्या साहेबाकडे चल" अशी तंबी द्यायला पाहिजे होते.
३. विदेशी पर्यटका समोर तुमची / देशाची / संस्कृतीची "इभ्रत जाईल" अशी खोटी भीती तुम्हाला वाटली, त्यामुळे तुम्ही जॉन आला तेंव्हा त्याच्या बुद्धीची वस्तुनिष्ठ मदत नाकारलीत, त्याला गाडीत जाऊन बसण्यास सांगीतलेत. कदाचीत तो अशा परिस्थीतीत जास्त अनुभवी असेल. अपयशाची वाच्यता ऑफिसात होईल अशी देखील भीती तुम्हास त्यावेळी वाटली असेल.
४. तुम्ही जर त्याचे हात ओले केले नाहीत तर, तो तुमची गाडी घेऊन टाकेल / गाडीचे नुकसान करेल , अशी बाळबोध भीती तुम्हास वाटली. तो असे प्रत्यक्ष काहीच म्हणाला नाही, तुम्हीच असा अनुमान काढलात. तुम्ही त्याला असे म्हणाला असता की जर तू गाडी घेऊन जाऊ दिली नाहीस तर तुझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देईन तर मग कदाचीत तो नरमला असता.
५. सरते शेवटी जर तुम्ही, कायद्याच्या वरच्या माणसाचे " आप्त , स्वकिय " आहात एव्हढे जरी भासवू शकला असतात तर त्याने कदाचीत तुम्हाला, चुकलो साहेब असे म्हणून सलाम ठोकला असता. अश्या युक्त्या तुमच्याच हापिसातल्या "सेल्स" च्या लोकांना जास्त चांगल्या जमतात, विचारा त्यांना.
या भारतात जगण्यासाठी फक्त संशोधक [ वा याच्या एव्हढे हुशार राहून चालत नाही] इथे "स्ट्रीट स्मार्ट" रस्त्यावरची हुशारी सुद्धा अंगी बाणवावी लागते.
आपण वयाने ज्येष्ठ असल्यास, या क्लृप्त्या समजाव्यात, वयाने कनिष्ठ / समवयस्क असल्यास या सुचना समजाव्यात. वस्तुनिष्ठतेने एकूण परिस्थेतीची उकल केली आहे. वैयक्तीक काहीही नाही.
परिस्थीतीचे ऑनलाईन आकलन जमले पाहिजे, नाहीतर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी " नाचता येईना अंगण ...... " असा लेखकाचा सूर आहे असे जाणवते.
धन्यवाद.