* आणि अशा नियमांना वैधानीक / कायदेशीर मान्यता असेल तरच ते पाळावेत अन्यथा नेहमी अशा नियमांना त्यांच्या साहेबांकडे वा योग्य मंचावर, योग्य पद्धतीने " अव्हान द्यावे".

-> 'आव्हान देणे' हे प्रत्येकाला दर वेळेस काही कारणान्मुळे शक्य होइलच असे नाही. प्रत्येक वेळेस माणसाकडे वेळ नसतो. त्याचाकडे दुसर्याही गोष्टी असतात करण्यासाठी. आणखिही कारणे असू शकतात.

* जॉन आला तेंव्हा त्याच्या बुद्धीची वस्तुनिष्ठ मदत नाकारली.
-> जॉन असून फारसा फरक पडला नसता, कारण भाषेचा अडसर. शिवाय अजून तमाशा झाला असता. आणि वर मनस्ताप, जॉन लाही.

* तुम्ही त्याचे हात ओले करताना त्याची वैधानीक पात्रता काय? हे न विचारता,  तोच अंतीम निर्णय घेणारा अधीकारी आहे, असे त्याने तुम्हास भासवले.

-> त्यावेळी अंतीम निर्णय घेणारा तोच असणे कदाचित शक्य आहे, वेळ संध्याकाळची असल्याने. शिवाय, आपल्या देशात काहीही होउ शकते.

* परिस्थीतीचे ऑनलाईन आकलन जमले पाहिजे,

-> ह्या बाबतीत प्रष्ण "हजरजबाबी" पणा चा आहे असे वाटत नाही. अश्या प्रसंगान्मध्ये आपल्यापैकी बहुसंख्य (७०%) लोक असेच करतील.