अफाट वर्णनाची ताकद प्रत्येक शब्दाशब्दामधून! थेट चित्र उभे राहिले. आपल्या मुक्तछंदात गजब ताकद आहे.
राहवत नाही म्हणून मला माझे आठवलेले शेर लिहित आहे.
विरहात रात दुःखाठायी प्रभात आहे
झाली पुरी मनाची भटकी जमात आहे
जाईल जन्म बहुधा ओढून काढण्यातच
काटा तिच्या स्मृतीचा किति आत आत आहे
यापुढे मला आपल्या कवितांची प्रतीक्षा राहील. आपण जे टी शर्ट किंवा खांदा दिसण्याचे वर्णन केले आहेत ते अजिबात सवंग वाटत नाही. याचे मूळ कारण की आपल्याला त्या खांद्याच्या दर्शनामुळेच सर्वप्रथम ती 'ती' असल्याची जाणीव झलेली आहे.
एकदा आपले 'या' अन 'संदेश' या कवितांचे प्रत्यक्ष सादरीकरण पहायची इच्छा आहे.
मी निरोप पाठवण्याच्या वर्गात मोडत नाही असे दिसते, तेव्हा माझा दुरध्वनी क्रमांक इथेच देत आहे. जमल्यास फोन करावात.
९३७१० ८०३८७
धन्यवाद!