प्रशांत साधना, अधीर वासना विशेष! अजून जीवनात ह्या किती विटंबना हवी ? अतिशय प्रवाही, प्रभावी ओळ.

जगात दु:ख केव्हढी बघेनही, द्रवेनही

बघायला नजर मला, तुझी, दयाघना, हवी

केवढी दुःखे (दुःखं) केवढे दुःख केवढे चालून जाईल असे वाटते. दोन सलग गुरू ह्या वृत्तात नसल्यामुळे ही अडचण. नजर ऐवजी दिठी बरे वाटेल का? बघायला मला तुझी दिठी दयाघना हवी असे काहीसे?

गझल एकंदर आवडली.