वरदा, या शब्दविषयक लेखनाने मराठी शब्दांच्या नवनवीन घडणीविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली हे बरेच झाले आहे.

गोडसेंनी वापरलेले शब्द, प्रशासनिकदृष्ट्या नव्याने वापरले गेले होते म्हणून उठून दिसले. पण एरव्हीही मराठीत अस्तित्वात असणारे, नव्याने घडवलेले, नव्या संकल्पना व्यक्त करणारे आपल्या संस्कृतीच्या आधाराने घडवले जाणारे शब्द कायमच वापरात, व्यवहारात आणण्याची गरज असते. त्यांचेबाबत फारसा विरोध न दाखवता त्यांना सामावून घेण्याचा कल असावा.

या गरजेखातर 
दुवा क्र. १

या अनुदिनीवर अनेक शब्द एकत्रित केलेले आहेत त्यांचाही वापर करता येईल.

श्रावण यांचे म्हणणे योग्यच आहे.

जुन्या पुस्तकाचे, नव्या आकलनासंदर्भात पुनर्निरीक्षण करून, उपयुक्त माहिती उजागर केल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!