प्रत्येक गृहितक / ऍझंप्शन / हायपॉथिसीस, तपासून / टेस्ट करून पाहावे म्हणजे कधीच फसगत होणार नाही. ही परिस्थीतीचे हजर आकलन [ सिच्युएशनल ऍनालीसीस/ त्या माणसाचे बिहेवीयर ऍनॅलिसीस ] करणाऱ्याची हत्यारे आहेत.
नियमभिरू / कायदाभिरू / देवभिरू असण्यापेक्षा नियमपालक [ सन्मान करणारा] / कायदापालक / देवभक्त असावे, तुमच्या सारख्या उच्चशिक्षीत माणसाला हा सुक्ष्म फरक सांगणे न लगे.
तुम्ही या प्रसंगात एक टिपीकल " मराठी " माणसाची वर्तणूक दाखवलीत. हा प्रसंग मी एक "केस स्टडी च्या "
दृष्टिकोणातून पाहिला व आकलन केला. त्यात मला, माझ्या सारख्या एका सुशिक्षीत व सुसंस्कृत मराठी माणसाला [सहानुभूती व स्वानुभूती तुमच्या बाजुनेच ठेवून] एका कम-शिक्षीत व असंस्कृत माणसाने कसे गंडवले [ एका पाटिच्या व थोड्या बोलण्याच्या कौशल्याच्या / ट्रांझॅक्शनल स्कील्सच्या, भांडवलावर ] व अशा "वृत्तींचे तंत्र" कसे जागीच मोडून काढावेत याचे पुस्तकी नव्हे तर व्यवहार्य उपाय / तोडगे / प्रतीतंत्र , माझ्या प्रतीसादात मी वस्तुनिष्ठतेने सुचवले आहेत.
तुमचा त्या परिस्थीतीत प्रतीसाद " दाम" या मार्गाने उकलण्याचा होता,[ साधारण मराठी माणुस असाच वर्तणुक दाखवतो ] तो "साम" , "दंड " वा "भेद " या मार्गांनी सुद्धा कसा उकलता आला असता याचे काही नमुने / भविष्यासाठी नवीन पर्याय / ऑप्शन्स, माझ्या प्रतीसादात मी नोंदवलेत. वाचकांनी याचा वापर / सराव करून पाहावा असेच हे पर्याय आहेत.
मी जिथे जिथे " तुम्ही " हा शब्द वापरला, तिथे तिथे, मी तुम्हांस वैयक्तीक परिचीत नसल्याने, तो " तुम्ही " शब्द व्यापक अर्थाने सर्व वाचकांसाठी [ अशा प्राप्त परिस्थितीत अडकलेल्या वा अडकण्यापुर्वी ] निर्देशक होता. तसे मी स्पष्ट लिहावयास पाहिजे होते. क्षमस्व.
बाकी अशी कात्रीत धरणारी / फसवणारी अनेक माणसे मला आजवर भेटली, ऐनवेळी सुचलेल्या [ हजर जबाबीपणा म्हणा हवे तर वा काहिही म्हणा ] "प्रतीतंत्रांमुळे " / "अँटिटेकनिक्स" मुळे गंडवणाऱ्या माणसांची डाळ माझ्या समोर अजून शिजलेली नाही एव्हढेच नम्रपणे मला नमूद करावेसे वाटते.
उपरोक्त "प्रतीतंत्राची " पुस्तके बाजारात सुद्धा मिळतात, सराव करण्यासाठी.
धन्यवाद.