चोपडा यांना तेच तेच करून कंटाळा कसा आला नाही ?
वैविध्यपूर्ण भूमिका करणे ही कलाकाराची गरज असली पाहिजे.
केवळ लाखो रुपयांचे मानधन मिळते म्हणून आधी जशी टाकली होती तशीच पाटी टाकायची, ही मानसिकता त्यामागे आहे का?


वरील प्रश्न/विधाने निरागस आणि/म्हणूनच गमतीशीर आहेत. हिंदी मसाला चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्यांकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार ? त्यांना कंटाळा नक्कीच येत असणार. पण तो त्यांच्या पोटापाण्याच्या व्यवसाय आहे.  तुम्ही वेगळी भूमिका असलेला चित्रपट घेऊन जा त्यांच्याकडे. ते नक्की स्वीकारतील असे वाटते.

तुमच्या प्रश्नांचा सूर बघता त्या बिचाऱ्या प्रेम चोप्रांनीच तुमचे काय घोडे मारले आहे कळत नाही असे म्हणावेसे वाटते. माफ करा हो त्यांना. बाकी प्रश्नांआधी तुम्ही थोडक्यात दिलेली माहिती छान आहे.