इतिहासिनी यांनी मुद्दा उत्तम रीतीने मांडला आहे.
उष्ण प्रकृतीचे अन्नपदार्थ आणि अतिउष्ण प्रकृतीचे मसाल्याचे पदार्थ हे गर्भाला मारक असतात. असं ऐकून आहे. ते गर्भवतीने खाऊ नयेत अशी पद्धत आहे. आजदेखील गर्भावस्थेत मुलींना "अमूक खाऊ नये" (पपई, मिरे, अतिरिक्त प्रमाणात तिखट अथवा मिरची, गूळ, अतिरिक्त प्रमाणात चिंचगुळाचा कोळ) असे जे पदार्थ आहेत ते बहुधा याच वर्गातले आहेत. अर्थात, रामायणकाळात पपई भारतात होत नव्हती बहुधा (नक्की आठवत नाही.) पण या गुणधर्माचे काही अन्नपदार्थ अवश्य असावेत आणि त्याचा वापर प्रसंगी केला जात असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. निर्विवाद पुराव्यासह माहिती उपल्ब्ध होते का ते मात्र पाहिले पाहिजे.