प्रेम चोपडांना देखिल चित्रपटाचा नायक होण्याची इच्छा झाली असेलच की! पण नाही मिळाल्या त्या भुमिका तर 'खाईन तर तुपाशी' करण्यापेक्षा जे मिळतंय ते घ्या असाच सुज्ञ विचार त्यांनी केला असेल तर त्यात काही चुकीचं नाही. नाहीपेक्षा पुलंच्या भाषेत 'सेनापती होण्याच्या ईर्षेने सैन्यात शिरावे आणि घोड्याला खरारा करण्याच्या कामावर नेमणूक व्हावी' असं (आपल्यापैकीही) बऱ्याच जणांच्या बाबतीत झालं असेल!
पण बाकी मला असं वाटतं की जे काही काम त्यांना मिळालं ते त्यांनी निष्ठेने केलं. खलनायकाचा लोभीपणा, नजरेतला हव्यास, दुष्टबुद्धी त्यांनी जबरदस्त उभा केला.
आमोद.