संजय,

मला हे कसं सुचतं हे सांगणं अवघड आहे. एवढं मात्र खरं की सगळं एका दिवसात सुचत नाही. या कथेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही कथा मला 'सरप्राईज' च्या पहील्या भागाला आलेल्या प्रतिक्रियांमुळे लिहावीशी वाटली. मग मी काय लिहीता येईल यावर विचार करताना कुणीही पहिल्या डेटला काय केलं असतं यावर विचार केला. साहजिकच कुठल्याही माणसाला थोडं झकपक रहावसं वाटेल असं लक्षात आलं. तेव्हा प्रसाधनांच्या जाहिरातीतील अतिशयोक्ती डोक्यात आली आणि तिचा वापर करायचा ठरवला. हे जसं जसं आठवतं तसं तसं मी ते लिहून ठेवतो. मग बऱ्यापैकी मसाला जमला की लिहायला बसतो. लिहीताना नोंदीतल्या सगळ्या गोष्टी वापरतो असं नाही. लिहीताना डोक्यात सगळी पात्रं तसेच वाचकही असतो. ह्या प्रकरणाला ५-६ आठवडे सहज जातात.

आलेल्या सर्व प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार!

-- चिमण