तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते
तसे सोबतीच्या करारात होते
या ओळीत गडबड आहे.
पहिल्या ओळीचा संबंध (किंवा सर्वश्रुत शब्दप्रयोग 'प्रभावी समारोप' ) दुसऱ्या ओळीशी/त मला आढळत नाही.
माझ्या स्वप्नात तुझे स्वप्न होते. म्हणजे, तु जे काही स्वप्न पाहिलेस तेच स्वप्न पूर्ण व्हावे हे माझे स्वप्न होते, असा अर्थ व्हावा!
त्यापुढे, 'तसे' या शब्दामध्ये 'तसेच ते' असे म्हणायचे असल्यास, तेच स्वप्न सोबतीच्या करारातही होते असा अर्थ होईल. सोबतीच्या करारात तेच स्वप्न होते याचा अर्थ, आपण जो सोबतीचा करार केला त्यात मुख्यत्वेकरून तुझे स्वप्न पूर्ण होईल हा एक क्लॉज होता. असे असल्यास पहिल्या ओळीतल्या 'माझ्याच' या शब्दाचे प्रयोजन नष्ट होते. तो 'च' 'माझ्या' या शब्दाला न लावता 'स्वप्न' या शब्दाला लावला जायची आवश्यकता भासते.
'तसे' या शब्दाचा अर्थ जर 'तसे तू म्हणतोस ते खरंय, पण प्रत्यक्षात तसे नाही' अश्या अर्थाने घ्यायचा असेल तरः
खरे तर आपण तुझे स्वप्न आपल्या सोबतीच्या करारात घ्यायचे होते, पण प्रत्यक्षात ते माझ्या स्वप्नातच होते. इथे सोबतीच्या करारात ते स्वप्न घेतले न गेल्याची भावना निर्माण होऊ शकेल. म्हणजे, मी तुझे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले खरे, पण आपल्या सोबतीच्या करारात ते घेतले नाही, म्हणजे, करार व्यवस्थित झाला नाही.
माझ्यामते 'तसे' या शब्दाऐवजी 'जसे' किंवा 'जरी' 'असे' यातील एखादा शब्द वापरला तर 'अर्थाला स्पष्टपणा यावा' असे माझे मत आहे.
( वर मीच म्हंटले आहे की अर्थ बदलनारे बदल सुचवू नयेत, पण इथे तसे सुचवत आहे कारण मुळातच ओळीचा अर्थ अस्पष्ट वाटत आहे. ) - अर्थातच, ही माझी वैयक्तिक मते असल्यामुळे आग्रह करणे शक्यच नाही.