नामाला ई लावून केलेली विशेषणे सामान्यतः कर्ता दर्शवतात

उदा.

प्रेम -> प्रेमी = प्रेम करणारा/री/रे/रे/ऱ्या/री

द्रोह -> द्रोही = द्रोह करणारा/री/रे/रे/ऱ्या/री

त्यानुसार

आरोप -> आरोपी = आरोप करणारा/री/रे/रे/ऱ्या/री असा अर्थ रूढ व्हायला हवा असताना तो आरोप झालेला/ली/ले/ले/ल्या/ली (कर्म दर्शवणारा) असा चुकीचा रूढ झा(लेला आहे असे वाट)ल्या मुळे नवा पर्यायी शब्द सुरवातीपासूनच बिनचूक निवडावा असाही विचार त्यामागे असेल! ... अर्थात ह्याला माझ्याकडे आधार काही नाही. चू. भू. द्या. घ्या.