नामाला ई लावून केलेली विशेषणे सामान्यतः कर्ता दर्शवतात
येथे 'सामान्यतः' हा कळीचा शब्द आहे. असा निश्चित नियम नसावा.
उदा.
रोगी = रोग झालेला. ('रोग करणारा' - याचा जो काही अर्थ होईल तो - नव्हे. त्यासाठी कदाचित 'रोगकर्ता' / 'रोगकारक' वगैरे म्हणावे लागेल.)
मधुमेही = मधुमेह झालेला. ('मधुमेह करणारा' - याचा जो काही अर्थ होईल तो - नव्हे. त्यासाठी कदाचित 'रोगकर्ता' / 'रोगकारक' वगैरे म्हणावे लागेल.)
सुखी = सुख असलेला. ('सुख करणारा' नव्हे. तो 'सुखकर्ता'.)
कैदी = कैद झालेला. ('कैद करणारा' नव्हे. कैद करणाऱ्याला काय म्हणावे बरे? ) ('कैद' हा शब्द संस्कृतोद्भव नसल्याने काही फरक पडू नये. )
थोडक्यात, असा निश्चित नियम दिसत नसल्यामुळे अशा नियमाचा 'आरोप' करणे योग्य वाटत नाही. अर्थात करणाऱ्यांनी इतका खोल विचार केला असेलच असे सांगता येत नाही, त्यामुळे हे कारण नसावे असे वाटण्याकडे कल होतो.