आरोपी, रोगी, मधुमेही वगैरे शब्द इंग्रजी मधील एंप्लॉई (नोकरी करणारा), असेसी (ज्याचे/ज्याच्या मालमत्तेचे मूल्यांकन होत आहे तो) अशा इंग्रजीमधल्या पद्धतीने आरोप, रोग, मधुमेह या शब्दांना शेवटी ई लावून तयार झाले/केले असावेत असा अंदाज आहे. हे सर्व शब्द नवे वाटतात. सुखी शब्द अशा पद्धतीने झाला नसावा. कैदी हा थेट अरबी/फारसीतून आला आहे असे वाटते. शब्दांना ई लावून नवे शब्द तयार करण्याची पद्धत अरबी/फारसीमध्येही असावी.

विनायक