आरोप हा शब्द अक्युझेशनसाठी तर अभियोग हा शब्द प्रॉसिक्यूशनसाठी सांगितलेला आहे.

येथे पाहाः

अक्युझेशन (आरोप)

प्रॉसिक्युशन (अभियोग)

ज्याज्यावर आरोप असेल त्यात्या सर्वांवर खटला चालू केलेला असेलच असे नाही. मात्र ज्याच्यावर खटला चालू आहे त्यावर आरोप हा असतोच. आरोप हा फक्त असतो किंवा नसतो पण अभियोग (खटला) न्यायप्रक्रियेचा भाग म्हणून चालवला जातो, चालवायला लागतो, त्यात आरोप सिद्ध होतो किंवा होत नाही. (असे मला वाटते. कायदेतज्ज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील)

ज्यांवर आरोप आहे ते आरोपी आणि ज्यांच्यावर खटला चालू आहे ते अभियुक्त असा भेद असावा.