संस्कृतांत रोगिन्(विशेषण) म्हणजे रोग असलेला-आजारी. त्याचे प्रथमेचे एकवचन रोगी. आरोप आणि मधुमेह हे शब्द संस्कृत आहेत. सुखिन्, रोगिन्‌प्रमाणेच शाखापासून शाखिन् म्हणजे वृक्ष असे शब्द संस्कृतमध्ये होतात. त्यामुळे आरोपी आणि मधुमेही असे शब्द, कदाचित मूळ संस्कृतमध्ये नसले तरी, बनवायला काहीच हरकत नाही.  त्यांतला ई हा प्रत्यय इंग्रजी आहे असे समजणे निखालस चूक आहे.  

क़ैद हा अरबी शब्द आहे फारसी नाही. त्याला कदाचित फारसी ई लागून क़ैदी हे नाम-वजा-विशेषण झाले असावे.

फारसी ई साधारणपणे भाववाचक नामे बनवतो.  कबूल-कबुली, फ़ितूर फ़ितुरी, फ़ंद-फ़ंदी, ̱गरीब-गरिबी, दुरुस्ती, तहकुबी, माफ़ी  इ. इ. क्वचित विशेषणे बनतात. आस्मान-अस्मानी, तूफ़ान-तुफ़ानी वगैरे.

मराठीत हाच ई प्रत्यय लागून धंदाविषयक नम होते.  वैद्यक-वैद्यकी, भिक्षुक-भिक्षुकी, तसेच एकी, मांत्रिकी, वैदिकी, माधुकरी इ.इ.