वरदाबाईंनी शालेयबद्दल लिहिले ते बरे झाले, नाही तर मी लिहायला सुरुवातच केली होती.  संस्कृतमध्ये ईय(छ, छण्), एय(ढक्, ढकञ् आणि ढञ्) असे काही तद्धित प्रत्यय आहेत. त्यातला छण् प्रत्यय लागून शालापासून शालीय बनते. अर्थ (पाठ)शाळेसंबंधी. असे आणखी शब्द म्हणजे स्वीय, मालीय, पाणिनीय इ.

ढक्(एय) प्रत्यय एकूण सुमारे दहा अर्थांनी लागतो, त्यातला एक शेत. हा लागून शालिपासून शालेय तयार होतो.  अर्थ-साळीचे शेत.  व्रैहेय म्हणजे तांदळाचे शेत. वैनतेय, आग्नेय,वाराणसेय, पौरुषेय वगैरे शब्दांत एय प्रत्ययाच्या वेगवेगळ्या अर्थांचा प्रत्यय येईल.

तरीसुद्धा मराठीत 'शालेय'चा शाळेसंबंधी असा अर्थ रूढ झाला असेल तर तो बदलण्याचे काही कारण नाही.

निरोधाविभाग हा मुद्रण दोष असावा.  

आरोप/आरोपीसंबंधी स्वतंत्र प्रतिसाद लिहिला आहे.