शिवाजीदादांनी १२५१ प्रश्न विचारले याला काही आधार आहे का? पाच वर्षात १२५१ म्हणजे एका वर्षात २५०.२ प्रश्न असे समीकरण होते आहे.

संसदेची अधिवेशने वर्षातून तीन वेळा होतात. म्हणजे शिवाजीदादांनी प्रत्येक सेशनमध्ये ८३.४ प्रश्न विचारले असे या आकडेवारीतून सूचित होते.

माझ्या मते लोकसभेचे अध्यक्ष हे प्रत्येक सदस्याला पक्षाच्या संख्याबळाप्रमाणे प्रत्येक अधिवेशनात काही मिनिटांचा वेळ बोलण्यासाठी देतात. त्यामुळे आढळरावदादांना प्रत्येक अधिवेशनात एवढे प्रश्न विचारण्यासाठी वेळ मिळाला असेल असे वाटत नाही.

शिवाजीदादांविषयी आदरच आहे. विशेषतः नाना नवले, किसनराव बाणखेले यांचा अनुभव घेतल्यानंतर थोडा कार्यक्षम प्रतिनिधी लोकसभेत असल्याचा सुखद अनुभव खेडच्या मतदारांना आहे. पण ह्या आकडेवारीमुळे दिशाभूल होऊ शकते असे वाटते.