प्रश्नांची संख्या इतकी मोठी आहे हे खरे आहे. यातला प्रत्येक प्रश्न प्रत्यक्ष सभागृहात चर्चेत आला असेलच नाही. प्रश्न (लिखित स्वरूपात) विचारला, (लिखित स्वरूपात) उत्तर आले, पटलावर दाखल झाले असे त्याचे स्वरूप आहे.
प्रत्यक्ष सभागृहात चर्चेत आलेल्या प्रश्नांची संख्या खूपच कमी असते, दिवसाकाठी दहा प्रश्नही चर्चिले गेले तर अनेकदा डोक्यावरून पाणी असे म्हणण्याजोगी परिस्थिती असते. इतर प्रश्न त्या-त्या दिवसाच्या कामकाजात आले असे नोंदवण्याची पद्धत आहे.
खरा प्रश्न आहे तो या विचारलेल्या प्रश्नांतून प्रत्यक्ष जनतेचे किती प्रश्न मार्गी लागले हा. अर्थात, आढळरावांच्या कामाची पद्धती पाहता या प्रश्नाचे त्यांचे उत्तरही तयार असणार हे नक्की.