जयश्री,
सुचवणी तुला मान्य झाली याचे समाधान आहे.
'जरी तीर सारेच भात्यात होते' ... ह्यात 'जरी तीर सारेच (सर्व प्रकारचे तीर) भात्यात होते तरी त्याचा वापर माझ्यावर (व्हायला हवा होता पण) झाला नाही.. 'अशी खंत प्रतित होते व अशी खंत 'माझ्या नशीबातच घायाळ होणे नव्हते' शी सुसंबद्ध वाटते.

'तुझे तीर सारेच भात्यात होते..... ' ह्यात वरच्या मिसऱ्यामध्ये 'माझ्या नशीबातच घायाळ होणे नव्हते' ह्यात 'तुझ्या तीरांनी घायाळ होणे माझ्या नशीबातच नव्हते' हा अर्थ 'तुझ्या तीरांनी'असे स्पष्ट न म्हणताही समजून येतोच! त्यामुळे पुन्हा 'तुझे तीर' असे म्हणण्याची गरज नाही.
पण 'तुला माझ्यावर तीर चालवायचे होते पण ते तीरच 'पहाऱ्यात बंदीस्त' होते' असा अर्थ माझ्या सुचवणीत येत नाही हे मान्य! असा आणि फक्त असाच अर्थ अभिप्रेत असेल तर मूळ शेर (काहीसा संदिग्ध असला तरी) तसाच ठेवणे जास्त योग्य!

विचार व्हावा.
जयन्ता५२