>>तेथे एक ते वीस देवनागरी अंक एकाखाली एक लिहून क्रम लावला असता तो अंकांप्रमाणे न लागता अक्षरांप्रमाणे लागला. <<

याचा अर्थ समजला नाही. अंक लिहिले असता अक्षरांप्रमाणे क्रम कसा लागेल?  मी परत एकदा प्रयत्‍न करायचा म्हणून, बरीच मराठी अक्षरे आणि काही दोन-अंकी संख्या(म्हणजे २४, ०४ इ.) वाट्टेल त्या क्रमाने एकाखाली एक लिहिल्या.  अकारविल्हे करायची आज्ञा दिल्याबरोबर प्रथम अक्षरे अकारविल्हे झाली आणि खाली अंक चढत्या क्रमाने उमटले. हाच अनुक्रम उलट करून मागितला तोही मिळाला. काही त्रुटी आहेत. उदा. ज्ञ हा 'ज'मध्ये येतो, क्ष 'क'मध्ये आणि नुक्तावाला फ़ सर्व अक्षरांच्या शेवटी. तेवढी दुरुस्ती हाताने करावी लागते.  मी या चाचणीसाठी युनिकोड प्रकारचा 'बरहा ७.० डायरेक्ट' हा टंक वापरला होता. प्रशासकांनी पुन्हा करून पाहावे, आणि इतरांनीही. चांगला अनुभव येतो ते समजल्यास कदाचित सगळ्यांना फायदा होईल.