लहान मुलांनी क्रिकेटचे सारे सामने पाहत दिवस काढले होते. त्याच काळात जन्माला आलेल्या एका मुलाचं नाव रिकीपॉण्टिंग ठेवलं गेलं होतं. नट्यांची नावं वगैरे तर अगदी सामान्य गोष्ट झाल्यासारखी आहे.
ह्यावरून दोन आठवणी :
१. माझ्या लहानपणी एका मुलाचे नाव राजकपूर असे ठेवलेले मी पाहिले आहे.
२. तेंडुलकरांनी सांगितलेला किस्सा. उत्तरेत बिहारात बाकी घोर अज्ञान असले तरी हेमामालिनी लोकप्रिय. एकाच्या टांग्याच्या घोडीचे नाव हेमामालिनी ठेवलेले होते.