आर्ग्युमेंट ह्या अर्थी अभिवक्तव्य आणि उपपादन असे दोन शब्द वापरलेले आढळले. अभिवक्तव्य आणि उपपादनामध्ये नेमका फरक कोणता ह्याबद्दल खात्री नाही.
नेमका अभिवक्तव्य असा शब्द जालावर कोठेही मिळाला नाही. अभिवक्ता ह्या शब्दाचा वापर हिंदीत सर्रास असल्याचे दिसते. शासकीय परिभाषा कोशामध्ये प्लीडरसाठी अभिवक्ता हा प्रतिशब्द सांगितल्याचे दिसते. येथे पाहावे.
मराठीत लोकमतमध्ये हा शब्द वापरल्याचे खालील उदाहरण मिळाले -
अभिवक्ता (लोकमत मधील बातमीचे मूळ पान) (हे युनिकोड नाही. तरी आयईवर विनासायास वाचता यावे.)
अभिवक्ता (तेच पान गूगलच्या साचवणीतून) (युनिकोड. कोठल्याही न्याहाळकावर वाचता यावे.)
उपपादन ह्या शब्दाचा नेमका अर्थ कळू शकला नाही. बाजू मांडणे/कार्यकारणभाव सांगणे (थिओराइझ? ) अशा काहीशा अर्थी तो वापरला जात असावा असे वाटते. येथेही हिंदी उदाहरणे बरीच आहेत. दोन मराठी उदाहरणे मिळाली.