'सत्य' हा शब्द सत् पासून बनला आहे. सत म्हणजे चांगले.  सदाचरण या शब्दात सत + आचरण असे दोन शब्द असून त्याचा अर्थ चांगले वर्तन आहे.  

"'सत्य' हा शब्द सत् पासून बनला आहे." - हे विधान अचूक आहे.

"सत म्हणजे चांगले."  - हे विधान चूक आहे.

'सत्' - म्हणजे 'जे जसे आहे तसे'. 

"सदाचरण या शब्दात सत + आचरण असे दोन शब्द असून त्याचा अर्थ चांगले वर्तन आहे." - हे विधान गढूळ असून त्यात  एक चूक आहे .

'सद्' + आचरण मिळून 'सदाचरण' - 'सद्' म्हणजे चांगले, समाजात,समाजाला मानवेल असे आचरण.

लेखाची सुरवात आपल्याला हवी तशी, असत्यावर आधारीत अशीच ( गढूळ व चूकीची) करून मग -

"सत्य कथन म्हणजे- जे मला कळले, समजले / उमगले ते तसेच - तिखट-मीठ न लावता, तसेच काही ही न वगळता, जसेच्या तसे सांगणे - होय. "

असे म्हणणे योग्य आहे का?

अनेक जण सत्याचा वापर हित-अहित पाहून करावा असे म्हणतात. म्हणजेच 'आपले हित साधत असेल तर खोटे बोलण्यास हरकत नाही! ' या अशा सोयीच्या सत्यतेवर माझा बिलकूल विश्वास नाही. खरे बोलणेच योग्य!

हे तुमचे विचार उच्च आहेत. त्यांना लेखापूरते धरून तरी रहायला हवे होते. कारण.....

पण  तरी ही सत्याचा आग्रह किती धरावा याचा ही विवेकाची बाब!

असं म्हणून इथं गाडी पुन्हा उलट धावायला लागली त्याचे काय?

असे म्हणतात- खरे बोलण्याचा एक फायदा असतो-आपण काल काय बोललो होतो हे लक्षात ठेवायला लागत नाही!

हे वाक्य विनोदी अंगाने लिहीलय की काय? अशी शंका आली. पण तरीही विसरभोळ्या लोकांची ही अशी विचारबैठक असते ही नवी गोष्ट मला उमजली.