तसेही उपरनिर्दिष्ट तक्त्याप्रमाणे 'अभियुक्त' हा शब्द 'अक्यूझ्ड'साठी प्रतिशब्द म्हणून योजलेला नाही, तर 'कैदी'साठी प्रतिशब्द म्हणून योजलेला आहे असे दिसते.

--------------- तक्त्यामध्ये लिहिलेला कैदी हा अर्थ पुस्तकात अभियुक्त च्या पुढे कंसात लिहिलेला नव्हता, तो मी लिहिला आहे. म्हणूनच नंतर एका प्रतिसादामध्ये तो अर्थ कैदी नसून आरोपी असावा असे लिहिले आहे. बंदीगृह हा शब्द पुस्तकात अनेकवेळा आलेला आहे, तेव्हा कैद्यासाठी बंदी शब्द म्हणून अभियुक्त हा आरोपी साठी असावा. पुस्तकात इंग्रजी शब्द मराठी शब्दांच्या पुढे कंसात बहुतेकवेळा दिलेले आहेत, तसे अरबी/फारसी शब्द मात्र दिलेले नाहीत.
अभियोजक शब्दापुढेही प्रॉसिक्युटर असा अर्थ (वा कोणताच अर्थ) कंसात दिलेला नाही, वकील हा शब्द सारणीमध्ये मी लिहिला आहे.

तेव्हा आरोपी आणि अभियुक्त मध्ये सूक्ष्मभेद केलेला असण्याची शक्यता असू शकते (नसूही शकते).