ही त्रुटी मलाही जाणवली होती.  म्हणूनच मी १, २, ३  असे आकडे न घेता ०१, ०२, ०३ असे घेतले. एकदा अनुक्रम लावून मिळाला की त्यांच्यातले शून्य पुसून टाकले.  तसेच क्ष=क्‍ष आणि ज्ञ=ज्‍ञ असल्याने क्ष-ज्ञ चे शब्द अनुक्रमे क आणि ज मध्ये जातात. तसे नको असल्याने ही दुरुस्ती नंतर कटाक्षाने करावी लागते.  माझ्या मते असले किरकोळ दोष सोडले तर अल्फ़ाबेटिक्स्‌ उपयुक्त आहे.