"मिळे कुणा? कुणातले संपलेत चंद्र आज?

आणि माथी कुणाच्या गं आज नक्षत्रांचे साज?

कुणा नदी? पाऊसही, आणि नवी फुले, पक्षी?

हस्तरेषांतून आणि कुणाच्या गं मोर-नक्षी?

सांगतेस ? तुला तरी मोजमाप साधले का?

कमी-जास्त, प्रयत्नांनी कुणीतरी सांधले का?"                  ..... व्वा, सुंदर लिहिलंत !