ज्या क्षणी दुनिये तुझ्या मी मुक्त कैदेतून झालो...
त्या क्षणी माझ्यावरी माझा पहारा नेमला मी!
मोठमोठ्यांच्या खुणाही कागदी नावेप्रमाणे...
चेहरा पाण्यात पाण्यानेच माझा रेखला मी!
अर्थ जो काढायचा तो काढ तू यातून आता
जो दिला नव्हता तुला तो शब्द मागे घेतला मी!
आतल्या गोटात नाही मी कधी गेलो कुणाच्या....
सोबत्यांच्या संशयाला वाव नाही ठेवला मी! " .... प्रदीपजी, ह्या द्विपदी अतिशय आवडल्या !