ह्या समारंभाचे वृत्त ईसकाळात वाचले.
मूळ बातमी : मराठी शब्दकोशाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन
"सध्या मराठी वापर फक्त साहित्यलेखन व धार्मिक लेखनात होत आहे. मराठी वृत्तपत्रे रोज नवीन शब्दांचा वापर करून मराठीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक शब्दकोश ही त्या भाषेची सांस्कृतिक स्मृती असते. शब्दांचे अनेक अर्थ कोशाच्या माध्यमातून मिळत असतात, त्यामुळे शब्दकोश हे भाषेचे महत्त्वाचे अंग आहे. मंडळाने विद्यार्थ्यांसाठी लहान कोश तयार केला पाहिजे.", असे डॉ तेलगिरी ह्या समारंभात म्हणाल्याचे बातमीत म्हटले आहे.
शासकीय फोटाझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, मुख्य पोस्ट ऑफिसजवळ, पुणे १ या ठिकाणी हा खंड विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती बातमीत दिलेली आहे.