(१३) अर्जुन व कृष्णाची प्रसिद्ध आहे जोडी...

          --- रावांना आहे परमार्थाची गोडी.

(१४) महाभारतात एकलव्याची आहे गाथा...

        --- राव म्हणतात कुलदेवतेच्या चरणी ठेवावा माथा.

(१५) कोल्हापूरची मिरची आहे झणझणीत...

      --- रावांचा आवाज आहे खणखणीत

(१६) कमळाभोवती भ्रमराचे गुंजन...

     --- राव करतात हरीचे भजन

(१७) आम्रतरूवर कोकिळेचे गुंजन...

    --- राव करतात गणेशाचे पूजन.

(१८) राधा होती हरिभजनात तल्लीन...

   --- राव म्हणतात आपण व्हावे ईश्वराशी लीन

(१९) कृष्णाने केले कालीयामर्दन...

   --- राव धरतात रामाचे चरण

(२०) सर्व क्षेत्रात स्त्रीयांनी आप्ल्या करतुत्वाचा उमटवलाय ठसा

  --- राव म्हणतात अविरत प्रयत्न करण्याचा तू घे वसा