"(किंवा रुळलेल्या परभाषीय शब्दांच्या बाबतीत अधिक दुर्बोध) शब्द  समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करणे? "

नवीन शब्द रूढ करणाऱ्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. समाजाची मानसिकता ही त्यातील प्रमुख! सावरकर त्यांच्या क्रांतिकारक वृत्तीस अनुसरून अक्रमक आणि आग्रही शैलीत बोलत हे खरेच! पण नवे विचार रुळवताना हे अपरिहार्य आहे. तरीही त्यांनी कधीही व्यवहार्यतेला सोडचिठ्ठी दिलेली नव्हती, हे ही तितकेच खरे! (समजून घेतल्यास!)

परकीय नवे शब्द हवेतच कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर शिवाजी राजांनी आरंभलेल्या कोश रचनेत सापडेल! अनेक फारसी / अरबी शब्दांना सुंदर मराठी शब्द त्यात सापडतील. त्यांनी कित्येक गडांची, किल्ल्यांची नावे  एतद्देशीय केली. का?

शब्द अवघड नसतात; अपरिचित असतात. बेताबेताने रुळतात. नगरपलिका, वाचनालय ... या सारख्या संस्था आमच्याकडे नव्हत्याच! हे शब्द घडवलेलेच! पण आता ते रुळले;  परके वाटत नाहीत. अगदी सामान्याला सुद्धा!