आपण सर्वदूर पसरलेली व्यपकता आहोत ही जाणिव म्हणजे आत्मजाणिव.
बलं स्थाने, मर्म स्थाने किंवा कौशल्य विकसित करता येतील पण आत्मा ही आपल्या सर्वाना सारखी मिळालेली अक्षय संपत्ती आहे. आत्मा ही अशी जादू आहे की ती एकदा समजली कि अस्तित्वाला कुठलाही धोका वाटत नाही, म्हणून तर नैनं छिंदंती शस्त्राणी.
आपण आत्मा आहोत हे ज्ञान नाही ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे आत्मज्ञानासाठी कोणतीही पायरी नाही.
आणि म्हणून तर मी आत्मा आहे हा विश्वास म्हणजे आत्मविश्वास. तो विश्वास सगळे जीवन बदलतो सगळी भीती घालवतो. मग सारे जीवन मजेचे होते. संधी, उपयोग, धोके या सगळ्यातून तुम्ही मोकळे होता.