जसा सिनेमाचा पडदा कोणत्यही दृश्यात समान आणि अविचलीत राहतो तसे सत्य म्हणजे या व्यक्त त्रिमीती जगाची चौथी मीती, अनंत पोकळी, सार्वभौम व्यापकता. या व्यक्त जगाच्या सिनेमाचा पडदा. कोणत्याही अभिव्यक्ती साठी सत्त्याची उपस्थिती अनिवार्य आहे, जसा सिनेमा पडद्या शिवाय दिसू शकणार नाही तसे सत्या शिवाय या जगातले कुठलेही प्रगटी करण शक्य नाही. त्यामुळे सत्य हे प्रत्येक वस्तूच्या, व्यक्तीच्या आत, बाहेर, सर्वत्र आणि चराचर व्यापून आहे म्हणून ते त्रिकालाबाधित आहे.
खरे बोलणे ही वर्तणूक आहे, सत्य तुमच्या बोलण्या किंवा वगण्यावर अवलंबून नाही.
आपल्याकडे इतका अध्यात्मिक गोंधळ झालेला आहे की सत्या सारखी डोळ्यासमोर असलेली गोष्ट त्यामुळे दिसणे दुरापास्तं झाले आहे.
सत्य हाच सगळ्याचा मूळ आणि अविभक्त घटक आसल्यामुळे सत्य आणि आपण दोन नाही. आपण म्हणजेच सत्य! हे एकदा समजले की निर्भयता येते आणि व्यक्ती निर्धोक बोलू लागते