तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दहशतवाद्यांना कठोर, विनाविलंब शिक्षा करणे वगैरे गोष्टी जरुरीच्या आहेत. पण बीजेपी ने परत राममंदिराचा नारा दिलाय तो कितपत योग्य आहे? देशापुढे एवढे आर्थिक, सामाजिक प्रश्न सोडवायचे बाकी असताना या अनावश्यक गोष्टी उकरून काढून नव्याने रान का पेटवायचे? आणि मंदिर बांधून गरीब लोकांच्या स्थितीत काय फरक पडणार आहे ?
काँग्रेस तर भ्रष्टाचारी आणि मुस्लिमधार्जिणी आहेच, कम्युनिस्टांनी काय गुण उधळले ते आपण सर्वांनी पाहिलेच आहे. बसप व समाजवादी हे तर १००% संधिसाधू आहेत. अशावेळेला सहाजिकच जनतेच्या भाजप कडून चांगल्या अपेक्षा होत्या. पण आपापसातील भांडणे, भ्रष्टाचार, गुन्हेगारांना तिकीटे देणे या सर्वच बाबतीत त्यांनी काँग्रेसशी स्पर्धा चालवली आहे.
त्यामुळे भाजप निवडून आले तरी आपल्या स्थितीत काहीच फरक पडणार नाही हे कटू सत्य आता सर्व जनतेला कळले आहे. जेंव्हा संधी मिळाली होती तेंव्हा त्यांनी ती वाया घालवली. भारतात एकजरी स्वच्छ पक्ष असता तर ही युतीचे घाणेरडे राजकारण करण्याची  वेळ आली नसती.